Home नांदेड वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत

वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत

129
0

राजेंद्र पाटील राऊत

वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यामध्ये गेली दहा दिवस झाले तापमान ४० – ४१ अंश दुपारपर्यंत असून मात्र सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडत असून काही ठिकाणी विज कोसळल्याची घटना घडली यामध्ये मौ.तग्याळ येथील शेतकरी गोविंद विठ्ठल भिंगोले यांच्या घरावर वीज कोसळून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली.अगोदरच अत्यंत गरीब असलेले हे कुटुंब,या संकटामुळे आज रस्त्यावर आले आहे.आज,संकटात असलेल्या या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून भांडे,कपडे,धान्य या रूपाने मदतीचा आधार देण्यात आला.जवळ असलेले सर्व जळून खाक झाले.आज,अंगावरील कापड्याशिवाय या कुटुंबाजवळ काहीही नाही.ही मदत म्हणजे,एक आधार आहे.
यावेळी शिवशंकर पाटील कलंबरकर,विनोद आपटे,राम सावळेश्वर,तग्याळचे सरपंच बालाजी पाटील गोपनर,विलास पाटील तग्याळकर,कुटूंब प्रमुख गोविंद विठ्ठल भिंगोले,दिपक गुमडे,पत्रकार संजय राचलवार,बालाजी घंटेलवाड,चंद्रकांत गुमडे,बालाजी उप्पे,विनायक भिंगोले,बालाजी भिकनर आदी
या घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा केला आहे.यात 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने या कुटुंबाला तात्काळ नूकसानीची भरपाई दिली पाहिजे..या कुटुंबाला मदत मिळेप्रयन्त पाठपुरावा करू असे रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here