Home कोल्हापूर गोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांचे चुरशीनं मतदान

गोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांचे चुरशीनं मतदान

93
0

राजेंद्र पाटील राऊत

गोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांचे चुरशीनं मतदान

कोल्हापूर :(नवे पारगाव प्रतिनिधी) जिल्ह्याच्या गोकुळ दूध संघासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील ठरावधारकांनी आज चुरशीनं मतदान केलं. कोरोनाचं संकट असताना
देखील ही निवडणूक पार पडली.पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक असा सामना यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सुमारे २,२८० मतदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा हातातून शेतकऱ्याच्या हातात जाईल”, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. “आमचे संपूर्ण पॅनेल निवडून येईल”, असंही ते म्हणाले. करवीर तालुक्यातील आपल्या मतदारांसोबत स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गोकुळ महासंघाच्या निवडणुकीबाबतीत मंत्री सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळ संघ शेतकऱ्यांच्या हातातच आहे, असं प्रत्युत्तर दिलं. कोणत्याच व्यापार्‍यांच्या हातात गोकुळ दूध संघ गेला नाही, हा दूध संघ गेली ३० वर्षे शेतकऱ्यांच्या हातामध्येच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलो आहे ,
केवळ मतदानासाठी जात नाही”, असा टोला देखील पी. एन.पाटील यांनी मंत्री सतेज पाटील यांना लगावला. काही संचालक विरोधकांकडे गेले असले तरी काही फरक पडणार नाही. सत्ताधारी पॅनेल पुन्हा एकदा निवडून येईल असा विश्वास देखील माजी आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल ३८५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ४ तारखेला होणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्याच ताब्यात राहणार की मतदार सतेज पाटलांची साथ देणार हे पाहणं येणारी वेळच ठरवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here