Home परभणी बामणीत मासे संकलन केंद्रावर हल्ला करून मारहाण झाल्याची घटना

बामणीत मासे संकलन केंद्रावर हल्ला करून मारहाण झाल्याची घटना

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220507-WA0067.jpg

बामणीत मासे संकलन केंद्रावर हल्ला करून मारहाण झाल्याची घटना

युवा मराठा न्युज :-शत्रुघ्न काकडे पाटील
(परभणी)जिंतूर तालुक्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या बामणी येथील मासे संकलन केंद्रावर दि.5 मे रोजी आम्हाला कामावर का घेत नाहीत म्हणून बामणी येथील आठ जणांनी हल्ला करीत मासे संकलन केंद्रावरील सामानाची तोडफोड करून तेथील खाजगी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. संस्था अध्यक्ष सं.माबुद यांच्या फिर्यादी वरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्व.राजीव गांधी मत्स्यव्यवसाय सह, संस्था मर्यादित येलदरी कार्यालय अंतर्गत बामणी येथे मासे संकलन केंद्र आहे याच मासे संकलन केंद्रावर आम्हास कामावर का घेत नाहीत म्हणून गावातील गोविंद प्रभाकरराव देशमुख व राम उर्फ छकुला छबुराव जाधव यांच्या सह आठ जण चार दुचाकीवर रात्री 10 वाजता येऊन आठ जणांनी अचानक हल्ला चढवला हातातील लाठ्या काठ्यांनी येथील खाजगी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली यामध्ये संकलन केंद्राचे सुपरवायझर धर्मेंद्र कुमार चव्हाण ,जगदीश सहाणे, मलिन सहाणे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत तसेच शेख अबुसाद याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता शेख अबुसाद यास सदर लोकांनी शिवीगाळ केली तसेच मोहम्मद अरमान नसरुल्ला अहमद यांचे भांडणात पैश्याचे पॅकेट गोविंद देशमुख याने घेऊन गेला.जाताजाता त्या लोकांनी तुम अगर याहपर रहें तो तूम्हे और इस शड को पेट्रोल डालकर जला देंगे असे म्हणत तेथील खुर्च्या ,टेबल, CCTV कॅमेरे इतर वस्तूंची तोडफोड करून 10 हजार रु नुकसान केले आहे. अशी फिर्याद संस्था अध्यक्ष सय्यद माबुद सय्यद महेबूब यांनी दिली त्यावरून आरोपी गोविंद प्रभाकरराव देशमुख व राम उर्फ छकुला छबुराव देशमुख यांच्या सह आठ जणांवर कलम 323,504,506,143,145,147,148,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक आरोपी अटक असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे हे करीत आहेत.

Previous articleपिसाळलेल्या कुत्र्याने शहरात घेतला ११ जणांना चावा.
Next articleछोड देते है ना!        (संपादकीय विशेष)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here