Home नांदेड पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात घेतला ११ जणांना चावा.

पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात घेतला ११ जणांना चावा.

78
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220509-064544_Google.jpg

पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात घेतला ११ जणांना चावा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पिसाळलेल्या कुत्र्याने दोन तासात शहरातील बाऱ्हाळी नाका ते कोर्ट पर्यंत ११ जणांना चावा घेतला आहे.

गुरुवार दिनांक ५ मे ला सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दर्म्यान बाऱ्हाळी नाकाते कोर्ट पर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याने २ तासात ११ नागरीकांना चावा घेतला आहे जखमींना शहरातील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमीक लस देण्यात आली आहेत पुढील उपचारासाठी सर्वांना नांदेड येथे लस देण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहीती उपजिल्हा रूग्णालयातील जनरल सर्जन गोपाळ शिंदे यांनी दिली आहे.
सायंकाळी या कुत्र्याने शहरात ११ जणांना चावा घेतला आहे. उपजिल्हा रग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीज न होण्यासाठी दिली जाणारी ‘राबीपूर’ ही लस उपलब्ध आहे. मात्र, पिसाळलेले कुत्रे चावल्यास ‘इमिनो ग्लोबलिंग’ ही लस घ्यावी लागते. ही येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे यात
शिवराज लक्ष्मण कांबळे वय ४० वर्ष मुखेड, संजय धोंडीबा एकाळे वय ३५. वर्ष उमरदरी, उद्धव न्यानोबा तेलंगे वय ४० वर्षे कोटग्याळ, श्रीकांत रवी चौधरी वय १० वर्ष मुखेड, अनुसया मसनाजी निमलवाड वय ५० वर्ष धामणगाव, सय्यद अनवर जीलानी वय २६ वर्षे मुखेड, साबेर जावेद शेख वय २४ वर्ष मुखेड, शिवाजी दिगंबर गायकवाड वय ४२ वर्ष मुखेड, धर्माजी गायकवाड वय ३६ वर्षे तांदळी, गंगाधर माधवराव लुट्टे वय ३५ वर्ष होकर्णा, आयुब मिरासाब शेख वय ४५ वर्ष मुखेड. यांना पिसालेल्या कुत्र्याने चवा घेतलेला आहे.

या पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. नगरपरिषदने कुत्र्याला पकडण्यासाठी ताबडतोब उपाय योजना करुन बंदोबस्कत करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Previous articleयवत पोलिसांची धडाडीची कामगिरी गांजा तस्करांवर कारवाई
Next articleबामणीत मासे संकलन केंद्रावर हल्ला करून मारहाण झाल्याची घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here