Home नांदेड कोरोना काळात मदतीचा हात ; जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. ———————————- मराठा...

कोरोना काळात मदतीचा हात ; जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. ———————————- मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

292

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना काळात मदतीचा हात ; जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
———————————-
मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

: राज्यात सर्वत्र कोरोनाने शिरकाव केला आहे.या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

दरवर्षी मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी सध्याची कोवीडची परीस्थिती पाहता त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. पुष्पगुच्छ , पुष्षहार , हारे तुरे न घेता सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सेवेत काम करणारे कर्मचारी यांचा सम्मान केला.

लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी डाॅक्टर , नर्स , परीचारीका , सेवक यांना मास्क , सॅनीटायझर , हाॅडक्लोजचे वाटप केले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव , माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम भाऊ धोंडगे , छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊल पाटील पवार , संयोजक प्रसाद पोले , गोविंद पवार सायाळकर , विजय पाटील पवार पांडुरंग लोंढे सर आदिची उपस्थिती होती.

Previous articleवीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत
Next articleडिझेल दरवाढीचा परिणाम ट्रॅक्टर चालक मालक व शेतकऱ्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.