Home नांदेड डिझेल दरवाढीचा परिणाम ट्रॅक्टर चालक मालक व शेतकऱ्यावर

डिझेल दरवाढीचा परिणाम ट्रॅक्टर चालक मालक व शेतकऱ्यावर

171
0

राजेंद्र पाटील राऊत

डिझेल दरवाढीचा परिणाम ट्रॅक्टर चालक मालक व शेतकऱ्यावर
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
देशात व राज्यात सध्या पेट्रोल व डीजेल चे दर खूप वाढलेले आहेत त्याचाच परिणाम सर्वसामान्यावर दिसून येत आहे तसेच सर्व स्तरातील व्यवसायाबरोबर शेतकऱ्यावर सुद्धा दिसून आला आहे म्हणजेच डिझेल दर वाढीचे परिणाम ट्रॅक्टर चालक मालक व शेतकऱ्यावर पडलेला आहे असे ट्रॅक्टर मालक-चालक बोलले जात रब्बी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतीची कामे सुरू करतो पूर्वी शेतीची कामे बैला द्वारे होत होती पण आता बैलाचे प्रमाणसुद्धा कमी झालेले आहे त्यामुळे ही कामे ट्रॅक्टर द्वारे केली जात आहेत ट्रॅक्टर वापरत असल्यामुळे शेतकऱ्याला डिझेल दर भाव वाढ फटका बसला असल्याची चर्चा शेतकरी ट्रॅक्टर मालक-चालक करत असताना दिसून येत आहे दरवर्षी ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जाते शेतकऱ्याला शेती नांगरणे करिता गतवर्षी एक एकर जमिनीसाठी 1500 रुपये द्यावे लागत होते आता हेच दर यावर्षी एक एकर जमिनी नांगरटी करिता 2000 रुपये द्यावे लागतात तसेच पणजी साठी पूर्वी 500 रुपये तर यावर्षी आता शेतकऱ्याला 800 रुपये प्रति एकर दराने द्यावे लागत आहेत तर तीरी साठी गतवर्षी 800 रुपये प्रति एक करत होते तर यावर्षी शेतकऱ्याला 1000 रुपये द्यावे लागत आहेत त्याचबरोबर रूटरला गतवर्षी एकर एक साठी 1000 रुपये द्यावे लागत होते पण आज यावर्षी 1500 रुपये द्यावे लागत आहेत विशेष म्हणजे या दरवाढीचा जास्त परिणाम शेतकऱ्या वर झालेला दिसून आला आहे कारण डिझेलचे वाढ असल्यामुळे आम्हाला सुद्धा दरवाढ करावी लागत आहे असे सांगितले शेवटी काही असलं तरी मात्र या दरवाढीचा फटका हा सर्व स्तरातील व्यवसायाबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा दिसून आलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here