Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात होऊ द्या चर्चा – शिवसेनेचच्याअभियाना

संग्रामपूर तालुक्यात होऊ द्या चर्चा – शिवसेनेचच्याअभियाना

120
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0108.jpg

संग्रामपूर तालुक्यात होऊ द्या चर्चा – शिवसेनेचच्याअभियाना

(ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा)
शिवसेना (उ.बा. ठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर, सह संपर्क प्रमुख दत्ताभाउ पाटिल, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, जि.उप प्रमुख तुकारामजी काळपांडे यांच्या मार्गदर्शनात दि. ०२/१०/२३ रोजी मौजे बोडखा,भिलखेड,काकोडा ,चोंढि टाकळेश्वर हिंगणा,कवढळ येथे शिवसेना तालुका उप प्रमुख कैलाश कडाळे पाटिल , गुणवंतराव मानखैर , राजु पाटिल ,भैय्या पाटिल,प्रशांत इंगळे , गजानन मानखैर ,प्रमोद भारसाकळे ,आत्माराम ठाकरे यांनी होऊ द्या चर्चा अभियानाच्या अनुषंगाने गावकऱ्यांशी चर्चा केली. बोलघेवड्या भाजपा सरकारच्या योजनांचा भांडा फोड केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पूर्ण झाली का, पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस यांच्या किंमती मध्ये झालेली दरवाढ,गेल्या वर्षीचा पिक विमा ,नैसर्गिक आपत्ती निधी इत्यादी विषयांवर चर्चा केली.
यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, सरपंच, उप सरपंच, ग्रां पं सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here