Home अमरावती अमरावती धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावती मधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणारा कशी?

अमरावती धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावती मधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणारा कशी?

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_210224.jpg

अमरावती धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावती मधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणारा कशी?
______________
दैनिक युवा मराठा
. पी एन देशमुख .
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जवळील बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीटर वरून १८०० मीटर केली जाणार आहे. जवळपास २०० एकरात विस्तारलेले हे विमानतळ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या ठिकाणी स्वरूपाची ७२ आसणी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोय देखील होणार आहे. दुसरीकडे या विस्तर्ण परिसरात असलेल्या शकलो वन्य प्राण्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. त्यांना बाहेर न काढल्यास भविष्यात ते केव्हाही धावपट्टीवर येऊन अपघात घडवू शकतात, ही शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी वन विभागा ला पत्र विहार केला आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणी होऊन विमान सेवा सुरू होईल मात्र गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वन्य प्राण्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे. भूसंपादन केलेल्या जमिनीवर मुबलक चारा, पाणी असल्याने त्यांचा या ठिकाणी ठीया आहे. याला पूर्ण परिसराला संरक्षण भिंत उभारल्याने या परिसरातून प्राणी बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांना बाहेर काढणे कठीण परिस्थिती झालेली आहे. जवळपास २०० एकर परिसरात हरीण, नीलगाय ,रानडुक्कर ,.मोर यासारखे शेकडो प्राणी परिसरात आहे. या सर्व प्राण्यांना बाहेर काढणे हे वन विभागासमोर आव्हान आहे. शिकारी प्राणी नसल्याने या ठिकाणी असलेल्या प्राण्यांची संख्या ही वाढतच आहे. या आधी एवढ्या मोठ्या संख्येने रेस्क्यू करण्याची वन विभागाला वेळच आली नाही. त्यामुळे नेमकी कुठली पद्धत वापरावी, याबाबत अजून वन विभागाने निर्णय घेतला नाही. बेलोरा विमानतळावरील धावपट्टीवर वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता पाहता त्यांना बाहेर काढण्याची संबंधित पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले असेल तर माझ्याकडे नव्याने चार्ज आला आहे. मिळवून आम्ही त्यावर लवकरच निर्णय घेऊ. असे दिव्य भारती वनरक्षक वन विभाग यांनी ही माहिती दिली.

Previous articleअमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात’प्रहारचा’ उमेदवार.
Next articleभिमा नदीकाठावरील 3 फ्युज लाईट 8 तास तात्काळ चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here