Home अमरावती अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात’प्रहारचा’ उमेदवार.

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात’प्रहारचा’ उमेदवार.

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_205941.jpg

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात’प्रहारचा’ उमेदवार.
______________
दैनिक युवा मराठा
पी.एन.. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता’बच्चू कडू’यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार नाही या अमरावती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवीले आहे. प्रहार चे मेळघाट मधील आमदार राजकुमार पाटील म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावती येथील प्रहार संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावती मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश भाऊ यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहार चे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असे त्यांनी सांगितले. तसेच दिनेश भाऊ हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बुक यांना प्रहार चे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. भाऊ यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. अमरावती मतदारसंघात प्रहार संघटनेचेदोन आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय केले होते? आमच्या मतानुसार आमचा लोकप्रिय प्रहार संघटनेचा पक्ष वाढवा असे सगळ्यांना वाटते असं आमदार राजकुमार पाटील यांनी म्हटले. दरम्यान, माझ्यासमोर दोन उमेदवार आहेत ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहे. सरकारी पैशातून श्रेय वादाचे बॅनर लावणे शिकविले मी शेकडो कोटी रुपयांचे काम केले, पण इतरा सारखे कुठेही मी माझ्या नावाचा बोर्ड लावला नाही. विकास कामे होत राहतील पण समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधी गरज आहे असे दिनेश भाऊ बुब यांनी सांगितले. प्रहार ही संघटना शिवसेनेतूनच निर्माण झालीय. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा पक्ष नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सोपस्कार करण्याची आवश्यकता वाटत नाही. शिवसेना रक्तातून काढू शकत नाही. हा भावनिक विषय, भगवा झेंडा हाती घेऊनच निवडणुकीला समोर जाणार आहे. जर उद्धवजी ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देऊ. प्रहार कडून ही निवडणूक लढवावी अशी सर्व मतदारांची इच्छा आहे.

Previous articleनितेश राणेची रक्त तपासणी करावी”; बच्चू कडू चा भाजपा आमदारावर”प्रहार”.
Next articleअमरावती धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावती मधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणारा कशी?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here