Home बुलढाणा आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी घेतली युवा मराठा न्यूज ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख...

आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी घेतली युवा मराठा न्यूज ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यांच्या तक्राराची दखल!!

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20221124-WA0069.jpg

आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी घेतली युवा मराठा न्यूज ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यांच्या तक्राराची दखल!!

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश ..

देशमुख यांनी आपल्या तक्रारी मध्ये असे नमूद केले होते
मा. तुकाराम मुंडे साहेब
मी एक ग्रामीण भागात वृत्तपत्रं आणि न्यूज चॅनेलमधून ग्रामीण समस्यांना वाचा फोडून समाजाला सुलभ नागरी सुविधांसह न्याय आणि हक्कांसाठी झगडणारा एक पत्रकार आहे.मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवाशी असून माझ्या नि:पक्षपाती आणि पारदर्शक पत्रकारितेच्या समाजसाधनेतून नागरीकांना हक्क आणि सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनातील सेवकांच्या दोषपूर्ण वाटचालीचे निरीक्षण करीत असतो.त्याची वेळोवेळी दखल घेण्याचे प्रयत्न करीत असतो.
माझ्या अवलोकनानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे २४ तास नसतात.त्यामुळे नागरीक सुव्यवस्थित आरोग्यसेवेपासून वंचित राहतात.कधी कधी रूग्ण शहराच्या ठीकाणी हलविण्याच्या जोखमीत अनेक रूग्ण दगावलेले आहेत.
कर्मचारी मन मानी पद्धतीने वागतात.मुख्यालयी तर राहत नाहीतच उलट केव्हाही येणे आणि वाटेल तेव्हा जाणे अशी त्यांची समाजाला संकटात टाकणारी बेजबाबदार कार्यक्रम असतात. गंभीर रूग्णांसाठी आशेचा मुख्य किरण ज्यांना गणले जाते ती डॉक्टर मंडळी सुध्दा मुख्यालयी राहत नाही अशी हे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळ करणारी विधारक परिस्थिती सतत असते.ते मुख्यालयी नसतात,त्यांचे कनिष्ठ सेवक थातूर मातूर उपचार करीत राहतात.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला डॉक्टरां संदर्भात माहीतीच नसते. आपल्या कर्तव्य काळातही डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठीकाणं आदिवासी भाग म्हणून ओळखली जातात. या आदिवासी नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासन प्रचंड खर्च करीत असतांनाच अधिकारी आणि आरोग्यसेवकांच्या असंवेदनशील,बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे आदिवासी भागातील रुग्णांना योग्य वेळेत उचित आरोग्य सुविधा मिळत नाहीत.
साहेब….आपणास आग्रहाची विनंतीआहे की आपण या पाहणीसाठी एखादा आकस्मिक दौरा बुलढाणा जिल्हामध्ये काढावा.यातून आपणास येथील सत्य परिस्थितीची कल्पना येईल.
समाजजीवनाच्या या संवेदनशील विषयात आपण गंभीरतेने लक्ष घालावे,आणि बुलढाणा जिल्ह्यात विशेष करून संग्रामपुर तालूक्याकडे लक्ष द्यावे.कारण हा तालूका आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी आपण नक्की भेट द्यावी अशी आपणास समस्त जनतेच्या वतीने विनंती आहे

बाँक्स
एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा धाक काय असतो, हे सर्व सामान्य जनतेने बघावे!
फक्त मंत्रालयात नियुक्ती झालेली आहे!
असे महाराष्ट्रातील 10, 20 अधिकाऱ्यांनी जरी जबाबदारीने काम केलं तर महाराष्ट्रातील जुनाट आणि सुस्तवलेलं प्रशासन सुतासारखे सरळ होईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here