Home रत्नागिरी भागशाळा वाटद खंडाळा प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती...

भागशाळा वाटद खंडाळा प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

140

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0025.jpg

भागशाळा वाटद खंडाळा प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी                                                              रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा.वि.वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.

सर्व प्रथम प्रशालेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री. देशमुख संस्थाचालक श्री लंबे श्री जगताप श्री.पाटील , श्री.सरगर सौ.खानविलकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी अनेक विचार आपल्या गाण्यातून व मनोगतातून व्यक्त केले. तसेच शिक्षकांमधून श्री.सरगर यांनी आपले विचार मांडले.

इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच सन २०२१-२२ च्या इयत्ता १० वी ब,क च्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी वस्तूरूपात दिलेली मदत यावेळी मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक श्री पोतदार यांना वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री.देशमुख व संस्थाचालक श्री.लंबे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

या सर्व कार्यक्रमास श्री. धोपट व श्री.सतिश मोहित यांनी संगीत साथ दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस.के.जाधव यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleवात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद
Next articleवरवडे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.