Home रत्नागिरी वरवडे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

वरवडे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

136

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0027.jpg

वरवडे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न                                                              रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग विभागामार्फत वरवडे विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये त्वचा नाक ‘काम, घसा, डोळे, शारीरिक व वैयक्तिक आरोग्य तपासणी करून स्वच्छतेचे महत्व, चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

वजनानुसार उंचीचीही नोंद घेण्यात आली. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी बांधण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तपासणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे विकार आढळले, अशा विद्यार्थ्यांसाठी औषधोपचार गोळ्या देण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे डॉ. श्री.बोले व सौ . बोले यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Previous articleभागशाळा वाटद खंडाळा प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
Next articleजिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवार्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे- रमेश कोरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.