Home रत्नागिरी जिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवार्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे- रमेश कोरे

जिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवार्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे- रमेश कोरे

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0028.jpg

जिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवार्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे- रमेश कोरे

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून रा.भा.शिर्के प्रशाला येथे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठी इन्स्पायर्ड ॲवार्ड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला कोल्हापूर विभागाचे विज्ञान सल्लागार रमेश कोरे यांनी मार्गदर्शन केले. श्री.कोरे यांनी शाळांनी इन्स्पायर्डसाठी नामांकन कसे करावे याविषयी माहिती देताना इन्स्पायर्ड ॲवार्डचे स्वरुप, महत्व व गरज, जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन प्रक्रिया, विद्यार्थी व शिक्षकांना इन्स्पायर्ड ॲवार्डचे होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व रत्नागिरी जिल्ह्यातून इन्स्पायर्ड ॲवार्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री.कोरे यांचे जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी पुस्तक आणि पुष्प देऊन स्वागत केले.तसेच शिर्के प्रशालेच्या वतीनेदेखील पुष्प आणि पुस्तक दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकजिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नरेंद्र गावंड यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी, शिर्के प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रमेश चव्हाण, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे, विज्ञान शिक्षक मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन रहाटे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३०० विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते.

Previous articleवरवडे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Next articleपांगरा येथे पडली घरावर विज,बालंबाल टळली जिवितहानी!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here