Home नांदेड भारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष धनाजी मनोहरराव जोशी यांची फेर निवड.

भारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष धनाजी मनोहरराव जोशी यांची फेर निवड.

271

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0104.jpg

भारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष धनाजी मनोहरराव जोशी यांची फेर निवड.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर: भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष जयदीप वरखिंडे यांनी ज्येष्ठ नागरिक कक्ष देगलूर च्या शहराध्यक्ष पदी सुधाकरराव जबडे तर मुख्य कक्ष(फादर बाॅडी) देगलूर च्या शहराध्यक्ष पदी धनाजी जोशी यांची नियुक्ती देगलूर येथील शरद पवार संकुल ज्येष्ठ नागरिक कक्ष येथे पार पाडलेल्या बैठकीत नियुक्ती पत्रे देवून करण्यात आली.
या प्रसंगी देगलूर चे विधिज्ञ अॅड. अंकुशराजे जाधव, बालाजी पाटील आंदेगावकर, नारायण पाटील उंद्रीकर, कपाळे सर, धनाजी जोशी, सुधाकरराव जबडे यांनी समयोचित भाषण करून मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक कक्ष देगलूर च्या शहराध्यक्ष पदी सुधाकरराव जबडे यांची निवड झाल्याने ज्येष्ठाचे मार्गदर्शन लाभेल, तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या समस्या सोडवण्यात हातभार लाभेल या सोबतच मुख्य कक्षाच्या शहराध्यक्ष पदी धनाजी जोशी यांची निवड केल्याने शहरात भारतीय मराठा महासंघाने जोमाने काम करेल अशा आशावाद चर्चेद्वारे व्यक्त करण्यात आला.
यांची मिल्ट्री च्या.पदी निवड झाल्याने भारतीय मराठा महासंघाकडून सत्कार करण्यात आला तसेच नारायण पाटील उंद्रीकर यांची मराठा मावळा जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
शहाजी वरखिंडे, मैलापूरे एम. बी. काका, दत्तात्रय कपाळे सर,चिलकावार,कुर्रहाडे माधव, देवकत्ते बालाजी, पवळ प्रकाशराव,कपिल कोसंबे, अॅड. अवधूत राजकुटवार, मल्लूरवार पी.जी.,संभाजी बिरादार, पांचाळ श्रावणकूमार, राचलवाड,इत्यादी उपस्थित होते.