Home जालना अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, साठवणूक, वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिक, सरपंच,...

अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, साठवणूक, वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी-

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0100.jpg

अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, साठवणूक, वापर होत असल्याचे निदर्शनास येताच
नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी
जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
– अंमली पदार्थ विरोधात पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी
 – गांजाची लागवड करणे बेकायदेशीर
– शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी
– मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा
जालना, दि. 22 (ब्युरो चीफ दिलीप बोंडे) :- आपल्या परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, वापर अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. तर ग्रामीण भागात अंमली पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास  सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  यांनी केली.
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, रेल्वेच्या पार्सल कार्यालयाचे प्रशांत स्वामी, सामान्य रुग्णालयाचे डॉ. संजय मेश्राम, शिक्षणाधिकारी मंगला धुपे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  डॉ. पांचाळ  म्हणाले की,  अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी  पोलीस प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी.

Previous articleनिधन वार्ता / कोकिळाबाई पाटील     
Next articleभारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष धनाजी मनोहरराव जोशी यांची फेर निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here