Home जळगाव फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

179

आशाताई बच्छाव

IMG_20231221_050238.jpg

फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पेालीस ठाण्यात दाखल एका गंभीर गुन्ह्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या व टोळी प्रमुख हैदरअली आसिफ अली यास चाळीसगाव शहर पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे
हैदर अली आसिफ अली व त्याचे सोबत असलेल्यानी फिर्यादी वैभव अरुण रोकडे (24) व साक्षीदारांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व चॉपरने फिर्यादीच्या डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती.
या प्रकरणी चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा आज पावेतो फरार होता. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील
उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भुषण पाटील, पोकॉ.विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, महिला हवालदार विमल सानप
यांनी दि.19 रोजी महेंद्र पाटील यांना हैदर अली हा त्याच्या राहते घरी आलेला असल्याची गुप्त माहीती मिळाली. यावरून निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशाने आरोपी हैदर अली यास त्याचे घरून ताब्यात घेतले.
हैदरअली याच्या विरूद्ध आज पावेतो शरीराविरुध्दचे 11, मालाविरुध्दचा 1, महिला अत्याराविरुध्दचा 1 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यास 2 वेळा हद्दपार व 1 वेळा A कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
त्यास न्यायालयात हजर केले असता पेालीस कोठडी मिळाली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिपक बिरारी, हवालदार विनोद भोई, पोकॉ. प्रकाश पाटील हे करीत आहेत.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी शिडी तात्काळ करावी मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी
Next articleयुवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.