Home मुंबई युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड!

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड!

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20231203-WA0210.jpg

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड!
(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)
मुंबई- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील युवा मराठा न्यूजचे सहसंपादक स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सन २०१८ पासून बापूसाहेब युवा मराठा न्यूज चॅनलच्या नेटवर्क मध्ये एकनिष्ठ व प्रामाणिक म्हणून कार्यरत आहेत.आजवर देशमुख यांनी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील नागरिकांना युवा मराठा परिवारात सहभागी करून घेतले आहे.तर मध्यंतरी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील बरेच कुटुंबातील घरादाराचे नुकसान होण्यासोबतच घरातील अत्यावश्यक जीवनसामग्री या पुरात वाहून गेल्याने, स्वप्नील देशमुख यांनी क्षणाची उसंत न घेता युवा मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे व बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष सौ.उमाताई बोचरे यांच्या सहकार्याने पुरग्रस्तांना थेट घरपोच किराणा किट पोहच करून महासंघाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केला म्हणून स्वप्नील देशमुख यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून,या बैठकीला युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष विजय पवार, युवा मराठाचे प्रविण क्षीरसागर, प्रमोद पवार, आंशूराज पाटील राऊत,व मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी युवा मराठा महासंघाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष विजय पवार यांनी स्वप्नील देशमुख यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन महासंघाचे कार्य वाढविण्यासाठी शुभकामना बहाल केल्यात.तर विजय पवार यांना महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आल्याचे यावेळी घोषीत करण्यात आले.
महासंघाचा व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीचा लवकरच राज्यस्तरीय मेळावा
युवा मराठा महासंघाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांनी विदर्भातल्या संतनगरी शेगांव येथे महासंघाचा व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीचा राज्यस्तरीय मेळावा घेतला जाईल असा निर्धार बोलून दाखविला.

Previous articleफरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Next articleमहापालिकेतील TDR घोटाळ्याची चौकशी होणार ? थेट ED कडे तक्रार केल्याने एकच चर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here