Home जळगाव हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई मंजुर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई मंजुर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_171205.jpg

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई मंजुर
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
—————————-
जळगाव जिल्ह्यातील 1,43,317 शेतकऱ्यांना रू.76 कोटी 40 लाख 04 हजार 607 नुकसान भरपाई पोटी मंजुर
————————
25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रियेस सुरुवात
—————————-
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा टप्पा 2) जळगाव जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचा समावेश करण्याची मागणी देखील निवेदन देऊन मागणी
—————————–
चाळीसगाव,(प्रतिनिधी विजय पाटील)- : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी १/- रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता.
यावर्षी खरीप हंगामात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या निकषानुसार ज्या महसूल मंडळांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग,सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन आर्थिक नुकसान झाले होते.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यातील २७ महसूल मंडळांमध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई या निकषानुसार 1,43,317 शेतकऱ्यांना रू.76 कोटी 40 लाख 04 हजार 607 एवढी नुकसान भरपाई मंजुर झाली असून सदरील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
त्याचप्रमाणे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा टप्पा 2) ज्याची अमलबजावणी जानेवारी 2024 पासून प्रस्तावित आहे. या मध्ये जळगाव जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचा समावेश करण्याची मागणी करीत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ना. अजित दादा पवार साहेब व कृषि मंत्री ना. धनजय मुंडे साहेब यांच्या कडे केली असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.

सणासुदीच्या दिवसांत भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांनी मानले आभार

तालुकानिहाय शेतकरी संख्या व मंजुर नुकसान भरपाई…

🔺अमळनेर 49,783 शेतकरी : रूपये 36 कोटी 14 लाख 17 हजार 282
🔺 भडगाव 18,174 शेतकरी : रुपये 8 कोटी 08 लाख 88 हजार 343
🔺 चाळीसगाव 56,951 शेतकरी : रुपये 24 कोटी 34 लाख 76 हजार 210
🔺धरणगाव 11,102 शेतकरी : रुपये 5 कोटी 49 लाख 03 हजार 68
🔺मुक्ताईनगर 565 शेतकरी : रुपये 20 लाख 31 हजार 989
🔺रावेर 2191 शेतकरी : रुपये 88 लाख 04 हजर 563
🔺 यावल 4551 शेतकरी : रूपये 1 कोटी 24 लाख 83 हजार 151

———

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजने च्या माध्यमातून हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या घटकानुसार जळगाव जिल्ह्यातील कापूस,उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी इ. उत्पादक 1,43,317 शेतकऱ्यांना रुपये 76 कोटी 40 लाख 04 हजार 607 एवढी 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजुर झालेली असून हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे काढणी पश्चात झालेले नुकसान, जास्त च्या पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना देखील तात्काळ क्लेम सेटेल करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील
———

Previous articleचाळीसगाव येथे मलनिसारण योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे – जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी रयत सेनेचे नगरपरिषद समोर आंदोलन
Next articleपंधरा हजार रुपयांची मदत दिवाळी पुर्व जमा करण्याची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here