Home जळगाव चाळीसगाव येथे मलनिसारण योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे – जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी...

चाळीसगाव येथे मलनिसारण योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे – जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी रयत सेनेचे नगरपरिषद समोर आंदोलन

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_170610.jpg

चाळीसगाव येथे मलनिसारण योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे – जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी रयत सेनेचे नगरपरिषद समोर आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरात तब्बल 65 कोटी रुपये खर्चून सुरु असलेले मलनिसारण योजनेचे ( भुयारी गटार ) काम अत्यंत नित्कृष दर्जाचे सुरु असून सदर काम नियमानुसार किंवा इष्टीमेट प्रमाणे सुरू नसल्याने कामाची गुणवत्ता राखली जात नाही म्हणून या कामाची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून जो पर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत सदराच्या ठेकेदाराचे बिल नगरपरिषदे देउ नये या मागणी साठी दि ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रयत सेनेने नगरपरिषद येथे आंदोलन केले.
रस्त्याच्या मध्यभागी केलेले चेंबर,घरांचे पाणी जाण्यासाठी बनवले चेंबर , भुयारी गटारीचे काम करताना पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावर खोदलेली चारीमध्ये खडीकरण करणे,जेथे काँक्रिटीकरण रस्ता असेल तेथे डाबरीकरण रस्ता असेल तेथे त्या पध्दतीने काम ठेकेदार करत नसल्यामुळे शासनाने ६५ कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाणार आहे
नवीन होणाऱ्या रस्त्याच्या उंची प्रमाणे मुख्य चेंबरची उंचीचे बांधकाम केले जात नसल्याने नविन रस्ते झाल्यानंतर चेंबर खड्यात जाणार असल्याने रस्त्यावरुन जाताना दुचाकी चालक त्या खड्यामध्ये पडून त्यांचा जिव जाण्याची दाड शक्यता आहे,तसेच मुख्य चेंबर ला वापरलेले मटरीयल त्यात विट,सिमेंट, निकृष्ट वापरले आहे.भुयारी गटाराच्या पाईपलाईनचे खोदकाम झाल्यानंतर पडलले खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नाही पाईपलाईन टाकल्यानंतर जेथे डाबरी रस्ते असतील किंवा काँक्रिटीकरण रस्ता असेल त्या ठिकाणी त्याप्रमाणे रस्त्याची कामे करणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदाराने फक्त माती टाकून रस्ते बुजवले आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी खडीकरण असेल त्या ठिकाणी खडी टाकून चारी बुजवणे गरजेचे आहे ते देखील ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम केले नाही तसेच घरांचे साडपाणी सोडण्यासाठी बनवले चेंबर अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनवले आहे. त्यात वापरलेले मटेरीयल वीट, सिमेंट नियमाप्रमाणे वापरले नाहीत आणि मुख्य चेंबर असेल किंवा घरगुती चेंबर असेल त्या ठिकाणी पाणी देखील मारले जात नाही त्यामुळे जवळपास ६५ कोटीची मलनिसारण योजना पाण्यात जाण्याची शक्यता आहे, शासनाने शहराचा विकास साधण्यासाठी निधी दिला होता मात्र त्या निधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होऊन संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याने कामात भ्रष्टाचार झाल्याने ठेकेदाराला कामाचे बिले देण्यात येउ नये तसेच मलनिसारण योजनेच्या कामाची चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी करावी यासाठी चाळीसगाव नगरपालिकेसमोर रयत सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश समन्वयक पी एन पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोल्हे, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर ,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, विलास मराठे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक दीपक देशमुख ,शहर उपाध्यक्ष सतीश पवार, प्रा चंद्रकांत ठाकरे,दिलीप पाटील,सागर जाधव ,शिवाजी गवळी ,राजेंद्र पाटील, मोहसीन शेख, श्रीकांत तांबे, दिलीप बिराजदार, विलास पाटील,अमोल पवार,किशोर दुसींग,दीपक पवार,महेंद्रसिंग महाले,ज्ञानेश्वर सोनार,बाळा पगारे,दिपक राजपूत,शहीद पिंजारी,दिनेश गायकवाड,मंगेश देठे,विनोद जाधव यांच्यासह मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड व रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous articleखेडगाव-बहाळ शिवारात उसाच्या शेतात मिळून आले बिबट्याचे दोन बछडे
Next articleहंगामातील प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई मंजुर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here