• Home
  • *सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक

*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक

*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक*
सटाणा,( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सटाणा तालुक्यातल्या केरसाणे येथील युवकाला औरंगाबाद येथे सिडको महामंडळाच्या कार्यालयात लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लोहणेर ता.देवळा येथील सोमनाथ पवार याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याने त्यास सटाणा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,सन २००६ साली लोहणेर ता.देवळा येथील सुधाकर पवार या व्यक्तीने केरसाणे ता.सटाणा येथील दिलीप सुकदेव मोरे यांच्या मुलाला औरंगाबादच्या सिडको महामंडळात लिपिक पदावर नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून आठ लाख रुपयांची मागणी केली.पैकी मोरे यांच्याकडून आगाऊ दोन लाख रुपये घेऊनही सुधाकर पवार याने काम केले नाही.व पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.व मोरे यांना बँक आँफ महाराष्ट्रचा धनादेश दिला,मात्र तो धनादेश वटलाच नाही म्हणून दिलीप सुकदेव मोरे यांनी सटाणा तालुका पोलिसात फिर्याद दाखल करताच तपासाची चक्रे गतीने फिरवून सुधाकर पवार यास अटक करण्यात आली आहे,सोमनाथ पवार यास न्यायालयात हजर केले असता त्यास गुरुवार दि. १२ नोव्हेंबर पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

anews Banner

Leave A Comment