राजेंद्र पाटील राऊत
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरद चव्हाण यांची सर्वानुमते निवड.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरा तांडा येथे येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड करण्यात आली. शालेय समिती अध्यक्षपदी शरद चव्हाण तर उपाध्यक्षपदी प्रेमदास चव्हाण तर सचिवपदी युवराज चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर यथोचित सत्कारही करण्यात आला. यावेळी येवतीकर सर, राजुरा तांडा येथील माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, उपसरपंच किरण चव्हाण, बालाजी राठोड (तालुका उपाध्यक्ष प्रहार संघटना). गणेश राठोड, अंकुश राठोड, पंडित राठोड, जयपाल राठोड, प्रकाश राठोड, जगदीश राठोड, तेजराव चव्हाण, सुधाकर चव्हाण आदी उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे राजुरा तांडा येथील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.




