Home पुणे पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त: चित्रा वाघ

पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त: चित्रा वाघ

67
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त: चित्रा वाघ

पुणे : उमेश पाटील /प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
‘पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद (Doubtful) आहे या प्रकरणाचे पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरण करु नका’ अशी टिका महाराष्ट्र भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मंगळवारी केली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध 24 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या प्रकरणाबाबत वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आपली भुमिका मांडली

‘संबंधित तरुणी मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे. तिच्या जीवाला धोका आहे. पीडित मुलीचे काल इस्लामपूर येथे लोकेशन होते, तर आज पणजी येथे आहे. तिच्या घातपाताची शक्यता मला वाटते आहे पूजा चव्हाण प्रकरणाप्रमाणे या तरुणीचे करु नका. संजय राठोड़ नंतर कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिक संशयास्पद आहे असा आरोप भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी केले नागपुर विद्यापीठातील एका विद्यार्थीने प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे प्रकार गंभीर आहेत.

वर्गात घुसुन मुलीवर हल्ला झालेल्या शाळेची मान्यता तपासावी आणि मुलीचा वैद्यकीय खर्च शासनाने उचलावा, शहरातील 4 ते 5 रुग्णालयात तरुणीचा गर्भपात करण्यासाठी तिला नेण्यात आले होते. त्यापैकी 2 रुग्णालयाची पोलिसांनी चौकशी केली, परंतु एका नामांकित रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी कुचिकने त्याच्या ओळखपत्राचा वापर केला, त्या रुग्णालयाची अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाहीया प्रकरणातील तरुणी अद्यापही सापडत नाही, पोलिस, आम्हीही शोध घेत आहोत. पोलिस तरुणी सापडली नाही, असे आम्हाला सांगत आहेत, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मात्र तरुणी तिच्या वडिलांसमवेत सुखरूप असल्याचे सांगून आमची दिशाभूल करीत आहेत. सत्ताधारी व विरोधकांना पोलिस वेगवेगळ्या स्वरूपची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.सोमवारी सकाळी अकरा वाजता घटना वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत मुलीवर एकाने चाकू हल्ला केला. हि घटना घडल्यानंतर मुलगी काही तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही इनामदार शाळेने तिला रुग्णालयात नेले नाही, तिच्या वडिलांची वाट पाहात बसले. त्यामुळे या शाळेला खरच मान्यता आहे का? याची तपासणी करावी. मुलीची आर्थिक परिस्थिती हालाखिची आहे, कुटुंबाला उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने तिची जबाबदारी घेऊन उपचाराचा सर्व खर्च उचलावा

Previous articlePCMC: स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण नाही:आयुक्त राजेंश पाटील
Next articleशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरद चव्हाण यांची सर्वानुमते निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here