Home पुणे PCMC: स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण नाही:आयुक्त राजेंश पाटील

PCMC: स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण नाही:आयुक्त राजेंश पाटील

61
0

राजेंद्र पाटील राऊत

PCMC: स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण नाही:आयुक्त राजेंश पाटील
पिंपरी-चिंचवड /उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज
स्मार्ट लिमिटेड कंपनीतील महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचे संचालकपदही रद्द झाले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमपीएमपीएलचे अध्यक्ष, मी स्वत: संचालक मंडळावर आहोत. गणसंख्या होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण येणार नाही.

-पिंपरी-चिंचवड .
स्मार्ट लिमिटेड कंपनीतील महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, दोन नगरसेवकांचे संचालक पद रद्दे झाले. तरी पुरेसे संचालक आहेत. गणसंख्या होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले.स्मार्ट सिटीचे काम वेगाने चालू आहे. फॉयबर ऑप्टीक नेटवर्किंचे काम जोरात सुरु आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत. मार्चअखेरपर्यंत 1500 कॅमेरे कार्यान्वित होतील. तर,महापालिकेच्या वतीने चार हजार असे एकूण सात हजार कॅमेरे शहरात बसविले जातील. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरअखेर कॅमेरे कार्यान्वित होतील, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here