• Home
  • 🛑 राज्यात दाखल होणार मान्सून! वाचा वेधशाळेचा अंदाज🛑

🛑 राज्यात दाखल होणार मान्सून! वाचा वेधशाळेचा अंदाज🛑

🛑 राज्यात दाखल होणार मान्सून! वाचा वेधशाळेचा अंदाज🛑
✍️ ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ११ जून :⭕ महाराष्ट्रात
मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होईल. गेले दोन दिवस तळकोकणात आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिणेच्या किनारपट्टी भागात मान्सून उद्याच दाखल होणार आहे. असंच वेगवान मार्गक्रमण राहिलं तर शुक्रवारपर्यंत मान्सूनचा पाऊस पुण्यात पोहोचेल आणि आठवड्याच्या शेवटी मुंबईत दाखल होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

पुढच्या एक दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यांना आणखी दोन दिवस लागतील.
सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे गोवा, तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी साधारण 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, असंही कश्यपी यांनी म्हटलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment