• Home
  • पुण्यात रात्री हेलिकॉप्टर फिरताना दिसतात

पुण्यात रात्री हेलिकॉप्टर फिरताना दिसतात

🛑पुण्यात रात्री हेलिकॉप्टर फिरताना दिसतात🛑

✍️( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

 

पुणे :⭕ हडपसर भागात गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळपासून हेलिकॉप्टरच्या फेऱया झाल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्ययुक्त भीतीचे वातावरण पसरले होते. कारण सध्या लॉकडाउनमुळे वाहतुकीवर निर्बंध असताना, हेलिकॉप्टर कसे काय फिरत आहे, असा प्रश्न उपस्थितीत होता. या बाबत चौकशी केल्यावर त्याचा उलगडा झाला अन हेलिफॉप्टर फिरण्याचेही कारण समजले.

 

कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यातंर्गत विमान, रेल्वे, मेट्रोच्या वाहतुकीवर निर्बंध आले होते. मात्र, केंद्र सरकारने काही प्रमाणात 26 मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सुरू केली. त्याच वेळी खासगी हेलिकॉप्टर सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेलिकॉप्टरमधून प्रवास करायचा असल्यास त्याची एक दिवस अगोदर पूर्वकल्पना द्यावी लागेल. तसेच प्रवास करणाऱया व्यक्तिंच्या नावांची, तपशिलांची यादी संबंधित कंपनीला द्यावी लागते. त्यानंतर भारतीय विमान प्राधिकरणाऱयाच्या अंतर्गत असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला उड्डाणाचे वेळापत्रक कळविणे बंधनकारक असते. त्यांनी परवानगी दिल्यावर हेलिकॉप्टरचा विमान प्रवास करता येतो, असे सूत्रांनी सांगितले.

 

हेलिकॉप्टरचा वैयक्तिक वापर करणाऱे तीन-चार उद्योगपती पुण्यात राहतात. त्यांचे स्वतःचे हेलिपॅडही आहे. तसेच हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर देणाऱयाही चार-पाच कंपन्या शहरात आहेत. अन मुख्य म्हणजे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेणारे किंवा त्यातून प्रवास करणारे उद्योजक, नोकरदार, व्यावसायिक यांचीही संख्या मोठी आहे अन हौशी प्रवासीही पुण्यात मुबलक आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment