• Home
  • पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात! ‘एवढे दान’

पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात! ‘एवढे दान’

🛑 पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात! ‘एवढे दान’ 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

तिरुमला (आंध्र प्रदेश):⭕लॉकडाऊननंतर आंध्रप्रदेशमधील तिरुपती मंदिर हे आता जवळजवळ अडीच महिन्यांनी सुरु करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी २५ लाखाहून अधिक रुपयांची दान तिरुपती चरणी जमा झालं आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या मते, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात आले. त्यानंतर पहिल्याच दिवशी दानपेटीत २५.७० लाख रुपये जमा झाले होते.

तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. देशातील सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिराला सर्वाधिक रोख रक्कम, दागिने आणि इतर देणग्या मिळतात.
एका महिन्यात मंदिराला २०० कोटींहून अधिक रुपयांचं दान मिळतं. २० मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे येथील देणगीचा ओघ आटला होता. दर महिन्याला २०० कोटींपेक्षा जास्त दान मिळणार्‍या या मंदिरात गेल्या अडीच महिन्यात एक रुपयाचं दान करण्यात आलेलं नव्हतं.
मंदिरात विशेष दर्शनासाठी ऑनलाइन ३०० रुपये प्रति तिकीट बुकींग आहे. दररोज फक्त ३००० लोकांनाच दर्शन दिलं जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी सुरू होताच जून महिन्यासाठीची सर्व तिकिटे बुक देखील झाली आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment