• Home
  • 🛑 कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍यांवर रुग्णालयातच उपचार. 🛑

🛑 कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍यांवर रुग्णालयातच उपचार. 🛑

🛑 कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍यांवर रुग्णालयातच उपचार. 🛑
✍️( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕ कोरोनाची लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील एकाही रुग्णाची घरीच उपचार किंवा क्वारंटाईन करण्याची अद्यापर्यंत मागणी नाही. महापालिका रुग्णालयामध्ये भरपूर जागाही उपलब्ध आहे. जागेची अडचण नाही. त्यामुळे सध्या तरी रुग्णांवर घरीच उपचार करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
अतिसौम्य किंवा लक्षणंविरहित रुग्णांना घरीच होम आयसोलेशन करता येणार आहे. डॉक्टरांनी अशा रुग्णांना प्रमाणित करण्याची अट सरकारने घातली आहे. सरकारकडे प्रतिज्ञापत्र देऊनच घरी विलगीकरणाची अनुमती दिली जाणार आहे. १७ दिवसांनंतर संबंधित रुग्णाला विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. मात्र त्याआधी १० दिवस रुग्णाला ताप न आल्याची अट आहे. गृह विलगीकरण संपल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली. तरी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळत आहेत. तर, काही रुग्णांचे केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह पण लक्षणे काहीच नसल्याचे समोर आले आहे.
१० मार्चपासून शहरातील 829 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 477 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरातील 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 338 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील तब्बल 173 जणांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. 107 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. तर, 20 जणांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाची लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची घरीच उपचार किंवा क्वारंटाईन करण्याबाबत अद्यापर्यंत कोणाची मागणी नाही. तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. जागेची अडचण नाही. त्यामुळे सध्या तरी रुग्णांवर घरीच उपचार करण्याची आवश्यकता भासणार नाही. रुग्ण वाढल्यास आणि घरीच उपचाराची मागणी झाल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.⭕

anews Banner

Leave A Comment