Home Breaking News 🛑 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर 🛑

🛑 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर 🛑

81
0

🛑 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्र :⭕राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर आहे. पावसाळी अधिवेशनाला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या विषयी माहिती दिली आहे. “परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणे शक्य नाही असे लक्षात आले. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले होते.कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होते. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.
या आधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार,कोरोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते.⭕

Previous articleअरुण गवळीने घेतला लँकडाऊनचा पुरेपूर फायदा !खाजगी गाडीने गाठले नागपूर
Next article🛑 कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍यांवर रुग्णालयातच उपचार. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here