• Home
  • अरुण गवळीने घेतला लँकडाऊनचा पुरेपूर फायदा !खाजगी गाडीने गाठले नागपूर

अरुण गवळीने घेतला लँकडाऊनचा पुरेपूर फायदा !खाजगी गाडीने गाठले नागपूर

🛑 अरुण गवळीने घेतला लँकडाऊनचा पुरेपूर फायदा !खाजगी गाडीने गाठले नागपूर 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी 3 जून रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शरण आला. मात्र, गवळी मुंबई येथून आला असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला ताबडतोब प्रवेश न देता सर्वप्रथम त्याची कोरोना तपासणी केली, अशी माहिती त्याचे वकिल ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. पत्नी आजारी असल्याच्या कारणावरुन 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषीत झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता.

13 मार्च रोजी अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती.
त्यानंतर लॉकडाऊन घोषीत झाल्याने त्याने दोनदा पॅरोलसाठी अर्ज केला आणि रजा वाढवून घेतली. तिसऱ्यांदा मात्र न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. परंतु, तळोजा कारागृहाने कोरोनाच्या भीतीमुळे अरुण गवळीला प्रवेश नाकारला. त्याने 29 मे रोजी चौथ्यांदा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करीत रजा वाढवून देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याचे सततचे गाऱ्हाणे न ऐकता त्याला पाच दिवसांच्या आत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, तो 3 जून रोजी कारागृहामध्ये शरण गेला. गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत 26 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुंबई येथील वैद्यकिय अधिकाऱ्याने डॅडीला 20 मे पासून ते 2 जूनपर्यत क्वारंटाईन केले होते. त्यामुळे, नागपूरात येताच त्याची मेडीकलमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार, तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

खासगी गाडीने गाठले नागपूर
अरुण गवळी याने मुंबई ते नागपूर (मध्यवर्ती कारागृह) हा सुमारे 850 किमीचा प्रवास खासगी गाडीने पूर्ण केला. मुंबईच्या प्रशासनाकडे नागपूर प्रवासाची परवानगी त्याने घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका दिवसात त्याची परवानगी मंजूर करण्यात आली.

लॉकडाऊनचा पुरेपुर फायदा
पत्नी आजारी असल्याच्या कारणावरुन 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषीत झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता. या दरम्यान, त्याची मुलगी योगीताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी साध्या पद्धतीने पार पडले. गवळीने या दरम्यान अनेकांना रेशन किट देत मदत सुद्धा केली.⭕

anews Banner

Leave A Comment