Home Breaking News आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये*

आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये*

122
0

*🛑 आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये* 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :- ⭕ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती व् संस्था, संघटनाकडून निधी देण्याच ओघ सुरु आहे. यात आज आयसीआयसीआय व्हेंच्युअरने एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योगदानाबद्दल आयसीआयसीआय व्हेंच्युअर कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या सहृद्यतेचे स्वागत करतानाच त्यांचे आभार मानले आहेत.

आयसीआयसीआय व्हेंच्युअरच्या कर्मचाऱ्यांचे आणि कंपनीचे योगदान असे एकत्रित सुमारे एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड१९ या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

आयसीआयसीआय बँक संचलित आयसीआयसीआय व्हेंच्युअर फंडस मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची १९८८ मध्ये स्थापना झाली आहे. ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रातील अग्रगण्य मानली जाते.

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसापासून ते काहींनी एक महिन्याचे वेतन या निधीसाठी दिले आहे. या रकमेत कंपनीनेही भर घालून एक कोटी रुपयांचा एकत्रित निधी सुपूर्द केला आहे. यातून राज्यातील आणि मुंबईतील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात सहभागी होता येत असल्याची भावना आयसीआयसीआयचे व्हेंच्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पूरकर यांनी व्यक्त केली आहे.

*मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19*

हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.⭕

Previous articleसंपादकीय अग्रलेख
Next articleअरुण गवळीने घेतला लँकडाऊनचा पुरेपूर फायदा !खाजगी गाडीने गाठले नागपूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here