Home Breaking News 🔴 *ब्रेकींग न्यूज* 🔴 *वडगांव शहरात जबरी चोरी* *१८ तोळे सोने ,...

🔴 *ब्रेकींग न्यूज* 🔴 *वडगांव शहरात जबरी चोरी* *१८ तोळे सोने , ५५हजार रोख रक्कम* *घेऊन चोरटे पसार*

91
0

🔴 *ब्रेकींग न्यूज* 🔴
*वडगांव शहरात जबरी चोरी*
*१८ तोळे सोने , ५५हजार रोख रक्कम* *घेऊन चोरटे पसार*

*युवा मराठा न्यूज* नेटवर्क कोल्हापूर 

हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहरामध्ये गणेश मंदिर पाठी मागे आज दुपारी भर दिवसा अडीच ते साडेतीन दरम्यान श्री. कृष्णात भीमराव पाटील यांच्या घरी जबरी चोरी झाली .
यामध्ये कोल्हापूरी साज साडे तिन तोळे , घंटन साडेतीन तोळे , आडिच तोळ्याची चेन , दोन अंगठ्या व तिन तोळ्याचा गोप असे एकूण १८ तोळे सोने व रोख रक्कम ५५ हजार रुपये घेऊन गेले असल्याची माहीती कृष्णात पाटील यांनी घटनास्थळी दिली.
कृष्णात पाटील व त्यांच्या मिसेस हे दोघेजन चावरे गावामध्ये शेतीच्या कामासाठी गेले असताना व त्यांचा मुलगा मुलगी हे पण दोघेही कामासाठी बाहेर गेले होते .
त्यामुळे घरी कोणीही नसल्यामुळे चोरट्यानी याचा अंदाज घेऊन धाडसी चोरी केली आहे.
घरसमोरच ऊसाचे शेत असल्याने आजूबाजूला काहीच समजले नाही.
चोरट्यानी घरावर पाळत ठेवून पहिला दरवाजाचे कूलूप तोडून घरामधे प्रवेश करून , त्यानंतर छोट्या रॉड च्या सहाय्याने बेडरूमधिल तिजोरी व आतील लाँकर चे लाँक तोडून त्यामधील १८ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले .
घरमालक कृष्णात भिमराव पाटील हे साडे चार दरम्यान चावरे गावाहून घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले त्यांनी लगेच तात्काळ वडगांव पोलीस स्टेशनला कळविले त्यावेळी वडगांव पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी आय.पी.एस. अधिकारी श्री.धीरज कुमार बच्चू , पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप काळे , पोलीस उपनिरीक्षक निशांतदार हे सर्वजन घटनास्थळी दाखल झाले . पोलीस कर्मचारी , श्वानपथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले ,श्वान पथक हे बिरोबा मंदिरा पर्यंतच गेले , पुढील तपास वडगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी

Previous article🛑 कचरा समजून फेकले दागिने…! सफाई कर्मचार्‍यांने १८ टन कचऱ्यातून शोधून परत केले 🛑
Next article*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here