Home नांदेड खर्दे “बु” विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

खर्दे “बु” विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

176

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0054.jpg

खर्दे “बु” विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
शिरपूर जिल्हा धुळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्य पी व्ही पाटील यांनी सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे योगशिक्षक ए जे पाटील यांनी आंतराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगून आसन प्राणायाम ध्यान यांची प्रात्यक्षिके करून घेतले.

व प्रत्येक आसन प्राणायमचे ध्यान महत्व प्रात्यक्षिके करतांना विषद केले. विदयालयाचे प्राचार्य पी.व्ही. पाटील यांनी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज योगाभ्यास करावा. यातून आपली स्मरणशक्ती वाढते व चांगल्या गुणांचा संचय आपल्यात होतो. असे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल सोनवणे आभार प्रदर्शन हितेंद्र देसले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी .व्ही .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी. बी धायबर, वाय .डी.मिठभाकरे‌ , हितेंद्र देसले,श्रीमती एस. जे. सूर्यवंशी, श्रीमती. एस .आर. निकम,श्रीमती मनीषा पाटील, श्रीमती सीमा जाधव,पी. एस. अटकाळे, बी. एस. बडगुजर, डी .एम. पवार , अमोल सोनवणे,बी .एस .पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Previous articleदेगलूर उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे
Next articleपुणे जिल्ह्यात पशुवैद्यकीय डाँक्टराने केले पशुसारखे कृत्य, क्षणातच केले स्वतःचे कुटूंब उध्वस्त!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.