Home पुणे पुणे जिल्ह्यात पशुवैद्यकीय डाँक्टराने केले पशुसारखे कृत्य, क्षणातच केले स्वतःचे कुटूंब उध्वस्त!

पुणे जिल्ह्यात पशुवैद्यकीय डाँक्टराने केले पशुसारखे कृत्य, क्षणातच केले स्वतःचे कुटूंब उध्वस्त!

212

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0036.jpg

श्री संजय वाघमारे पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी: एका पित्याने केली पूर्ण कुटुंबाची हत्या; दौंड तालुक्यातील वरवंड या गावी एक खळबळजनक घटना घडली. या घटनेमध्ये डॉ. अतुल शिवाजी दिवेकर वय वर्ष ४२, राहणार चैताली पार्क वरवंड यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये असे सांगितले आहे की, माझी पत्नी पल्लवी वय ३९, मुलगा अद्वित वय ९, मुलगी वेदांती वय ६ यांना मी स्वतः जीवे मारले असल्याची कबुली दिली. पत्नीची गळा दाबून हत्या केली, तर दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून त्यांनाही जिवे मारले. डॉ. अतुल दिवेकर यांनी सांगितले की कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलले आहे .माझी पत्नी मला सतत त्रास देत होते. त्यामुळे मला हे करावे लागले असे त्यांनी या चिठ्ठी मध्ये लिहिले आहे. डॉ. अतुल दिवेकर हे जनावरांचे डॉक्टर आहेत. तर त्यांची पत्नी पल्लवी ही श्री गोपीनाथ माध्यमिक विद्यालय वरवंड या ठिकाणी शिक्षिका आहे. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे त्यांच्यासह यवत व पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील सदर घटनेचा आढावा घेत पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.

Previous articleखर्दे “बु” विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
Next articleपंचायत समिति कार्यालयाची महाआरती आंदोलन करुन निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.