Home नांदेड पंचायत समिति कार्यालयाची महाआरती आंदोलन करुन निषेध

पंचायत समिति कार्यालयाची महाआरती आंदोलन करुन निषेध

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0042.jpg

पंचायत समिति कार्यालयाची महाआरती आंदोलन करुन निषेध
अंबादास पाटिल पवार
लोहा, (प्रतिनिधी)
आज (दि.२०) जुन रोजी अनेक समस्यांचा पाढा वाचत पैकी महत्वाच्या चे चार प्रश्न रेटून धरत प्रहार संघटनेच्या वतीने लोहा पंचायत समिती कार्यालयाची महाआरती आंदोलन करून निषेध नोंदवला गेला.आपले मनोगत ही व्यक्त कले.आंदोलनाची तात्काळ गंभीर दखल घेतली गेली.
धुळखात पडलेले दिव्यांगाची लवकरच साहित्य वाटप, दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश,घरकुल योजनेच्या आणि सिंचन विहिरीच्या फायली तात्काळ निकाली काढण्याच्या आदेश,तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या स्वखर्चातून दिव्यांगासाठी निधी वाटप करण्याचे तात्काळ आदेश
वरील आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालयाने गंभीर दखल घेत चारही मागण्या मान्य केल्या आणि तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.असल्याचे प्रहार संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष माऊली गीते यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात माऊली गीते प्रहार तालुका अध्यक्ष लोहा,विठ्ठल रावजी मंगनाळे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड, संतोष भावे ब्लू टायगर सेना जिल्हाध्यक्ष नांदेड, कृष्णा भाऊ केंद्रे प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, गणेश मोरे शहराध्यक्ष लोहा, चांद पाशा शेख दिव्यांग जिल्हा संघटक नांदेड, राहुल हंकारे दिव्यांग तालुकाध्यक्ष लोहा, अनिल पाटील शेट्टी तालुका अध्यक्ष मुदखेड, शंकर भाऊ आजचे वाढ तालुकाध्यक्ष बिलोली, मारुती मंगरूळ जिल्हा सचिव नांदेड, विजय डांगे तालुका उपाध्यक्ष लोहा, दिलेरखान पठाण सरपंच काबेगाव,संतोष कदम सरपंच कदमवाडी, शंकर भाऊ, यादव मोरे तालुका सचिव लोहा, तिडके, विजय मुस्तापुरे,संग्राम सुरनर ग्रामपंचायत सदस्य घोटका, आप्पाराव गायकवाड तालुका सचिव आदीं ची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here