Home नांदेड प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, जिल्हा नांदेड,ता.मुखेड च्या वतीने अकोला येथील पत्रकार...

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, जिल्हा नांदेड,ता.मुखेड च्या वतीने अकोला येथील पत्रकार रणजीत इंगळे यांच्या हत्येचा निषेध.

53
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230621-215516_WhatsApp.jpg

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, जिल्हा नांदेड,ता.मुखेड च्या वतीने अकोला येथील पत्रकार रणजीत इंगळे यांच्या हत्येचा निषेध.

ह्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तहसिलदार,पो.नि. मार्फत निवेदनाद्वारे मागणी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

अकोला येथील दैनिक वृत्तरत्न सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी रणजीत इंगळे यांची दिनांक १८ जून २०२३ रोजी अकोला जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील खामगाव रोडवरील गंगानगर परिसरात राहणारे दैनिक सम्राट चे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रा.रणजीत इंगळे हे रात्री दहा वाजताच्या दरम्यान घराकडे जात असताना यादरम्यान त्यांना फोन कॉल आल्याने त्यांनी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूस घेऊन फोनवर बोलत असताना अज्ञात व्यक्तीकडून पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने जबर वार केला.जोरदार वार घातल्याने पत्रकार रणजीत इंगळे यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते रस्त्यावर कोसळले मारेकरी जखमी पत्रकार इंगळे यांना ओढीत नेऊन जवळील रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रकच्या मागे नेऊन टाकले आणि घटनास्थळावरून ते मारेकरी पसार झाले.सदर घटनेची माहिती अकोला जुने शहर पोलीस ठाणे येथे कळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रात्रीला मृतदेह पोस्टमार्टम साठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर एका कॅमेरात ही घटना रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले आहे पोलिसांनी त्या कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेतले असून त्या फुटेज मध्ये पत्रकार इंगळे यांचा खून करणारा मारेकरी एकटा असल्याचे दिसून आले.अतिशय निर्विवाद असलेल्या व्यक्तीचे कोणासोबतही कसल्याच प्रकारचे वैर किंवा वाद नसताना त्यांची अशी हत्या होणे यामागचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेमागे कोण मास्टरमाइंड आहे याची प्रशासनाने कसून चौकशी करून मारेकऱ्यांना पकडुन कठोर शिक्षा देण्यात यावी. ते मृत्यू समयी ४८ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असून पत्रकार रणजीत इंगळे यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी.तसेच पत्रकार रणजीत इंगळे यांच्या कुटुंबीयांना तातडीने किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. आणि भविष्यात पत्रकारांवर असे हल्ले होवू नयेत यासाठी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.अशा आशयाचे निवेदन मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार राजेश जाधव व पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले. या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हासचिव पत्रकार भारत सोनकांबळे, तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे,सचिव आसद बल्खी,मुखेड तालुका पत्रकार संघातील सुनील पौळकर(दै.सकाळ),शेखर पाटील (दै.लोकमत),
विजय बनसोडे (दै.श्रमिक एकजूट), मेहताब शेख (दै.आदर्श गावकरी),ज्ञानेश्वर डोईजड (संपादक दै.श्रमिक लोकराज्य),गंगाधर सोंडारे (दै.सम्राट),संदिप पिल्लेवाड (लोकराज्य),विठ्ठल कल्याणपाड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleपंचायत समिति कार्यालयाची महाआरती आंदोलन करुन निषेध
Next articleश्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here