• Home
  • वीज बिलांची दुरुस्ती करण्यासाठी शिबीर घ्या-कलंबरकर

वीज बिलांची दुरुस्ती करण्यासाठी शिबीर घ्या-कलंबरकर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0076.jpg

वीज बिलांची दुरुस्ती करण्यासाठी शिबीर घ्या-कलंबरकर

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

शेतकऱ्यांना व घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वापर केलेल्या लाईट पेक्षा कितीतरी पटीने जास्त वीजबिल आलेल्या व येत असलेल्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आहेत.या विजबिलांची दुरुस्ती झाल्याशिवाय शेतकरी व घरगुती वीजग्राहक वीजबिल भरणार नाही.अनेक शेतकरी व घरगुती ग्राहक वापर केलेल्या विजेपेक्षा अधिक वीजबिल आल्याच्या तक्रारी करतात.म्हणून,या विजबिलांची दुरुस्ती झाली पाहिजे,यासाठी तालुकास्थरावर (मुक्रमाबाद,पूर्वीचा तालुका) शिबीर घ्या,अशी मागणी कार्यकारी अभियंता चेटलावार यांच्याकडे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.
घरगुती वीज ग्राहक आणि कृषिपंपाचे आलेले वीजबिल,हे वापर केलेल्या विजेपेक्षा कित्येक पटीने जास्तीचे बिल आहे.हे जास्त आलेले वीजबिल दुरुस्त झाल्याशिवाय ग्राहक वीजबिल भरणार नाहीत.अनेकांची बिले अंदाजित दिले जातात.विजबिलामध्ये खूप मोठा अनागोंदी कारभार आहे.यामध्ये दुरुस्ती होणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीजबिल दुरुस्तीचे शिबीर घ्यायला लावले होते.त्या शिबीरामध्ये अनेकांची वीजबिले मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहेत.त्याच आधारावर आपल्याकडे तालुका स्थरावर (मुक्रमाबाद,पूर्वीचा तालुका) वीजबिल दुरुस्तीचे शिबीर घेतले पाहिजेत.यामुळे वीजबिल दुरुस्तीचा प्रश्न सुटेल.अशी मागणी शिवशंकर पाटील कलंबरकर,विष्णू पाटील,हरिदास पाटील यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment