Home गडचिरोली युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या...

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रतिपादन..!!

148
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0074.jpg

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रतिपादन..!!                                                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासात व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले,अहेरी तालुक्यातील मरनेली येथे गोंडवाना क्लबच्या वतिने आयोजित भव्य ग्रामीण व्हलिबाल स्पर्धा च्या उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलत होते,ते बोलतान म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी माझा स्वतः कडून पारितोषिक देत असताना माझा एकच उद्देश्य आहे..!!

युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले या क्षेत्रात गेल्या पिढ्यांनू.पिढ्या पासून आपण लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत मात्र या भागाच्या अजून विकास झाले नाही याचं एकमात्र कारण काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.व वन हक्क दाव्याबाबत सर्वे करून वन हक्क पट्टे मिळवून देतो म्हणून या परिसरात आपप्रचार करून सर्वे करत आहेत त्याचा भूलतापाला बळी ना पडता योग्य निर्णय आपण घ्यावी व तिन पिढ्यापासूनच्या पूरवा व अतिक्रमण पंजी रद्द करून २००५ पासून अतिक्रमण केलेले नागरिकांना सरसकट पट्टे देण्यात यावी या साठी सम्बन्धित आमदारांनी विधान भवनात आवाज उठवले पाहिजे..!!

तेंव्हाच तर आपल्या नागरिकांना पट्टे मिळतील अन्यथा मिळणार नाहित,त्यासाठीच आपण जागरूक होऊन सतर्क राहावे असे मार्गदर्शन केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार २०००० हजार रुपये, दितीय १५००० हजार रुपये ,तर तृतीय १०००० हजार रुपये,याठिकानी देण्यात येणार आहे..!!

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,अहेरीचे नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,श्री.अँड,एच,के, आकदर,उपसरपंचा सौ.सुरक्षाताई,एच,आकदर,श्री, माधव कुडमेथे,राजाराम ग्रामपंचायतचे सदस्य नारायण सावकार कंबगोनिवार,नागेश शिर्लावार,मुत्ता पोरतेट,दीपक अर्का,नारायण चालूरकर,धर्मा पेंदाम,खमंनचेरु चे सरपंच सैलू मडावी,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट, सुरेश सोयाम,श्रीनिवास राऊत,राकेश सड़मेक,व्यंकटेश अलोणे,विनोद तलांडे,उपस्थित होते..!!

गोंडवाना व्हालीबाल सामन्याचे अध्यक्ष श्री, पांडू गावडे, उपाध्यक्ष मधुकर झोडे, व ईश्वर तलांडे, सचिव रगूनाथ मडावी, विनोद आलाम, सहसचिव अमोल गावडे, किशोर तलांडे, कोषाअध्यक्ष सडवली कोनम, अजित दुर्गे, क्रीडाप्रमुख रिमो आत्राम, प्रवीण डोंगरे आणि सदस्यगण सुरेश तलांडे, अजय डोंगरे, कुलदीप दुर्गे, प्रदीप डोंगरे, सचिन अलोणे, प्रकाश झाडे, प्रदीप पेंदाम, संदीप पेंदाम, सूर्यकांत कुमरे, विकास तलांडे, नितीन कुमरे, नरेश मडावी, सुरेश गावडे, लखन तलांडे, श्याम तलांडे, राजू कोनम, रमेश कोनम, नारायण कोनम, हिरामण कोणम, लक्ष्मण डोंगरे, मल्लेश आलाम, सुनील मडावी, राम आत्राम, सतीश तलांडे, रमेश आत्राम, दिलीप तलांडे इत्यादी मंडळगण उपस्थित होते.यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग प्रयत्नशिल होते..!!

Previous articleमहागाईच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन. केंद्र सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती वाढवल्याने जनता त्रस्त.
Next articleवीज बिलांची दुरुस्ती करण्यासाठी शिबीर घ्या-कलंबरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here