Home नांदेड श्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस उत्साहात...

श्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस उत्साहात साजरा.

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0032.jpg

श्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड दि.21 (वार्ताहर)
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील जागृत देवस्थान सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थांनचे प्रमुख श्री सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. श्री सद्गुरु नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री सद्गुरु नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थांनचे मठाधिपती सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस सद्गुरु सेवा समितीतर्फे नुकताच नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सद्गुरु नराशाम महाराज यांची पाद्यपूजा, फळ तुला, ग्रंथ तुला, शर्करा तुला, पुष्परचना करण्यात आली आहे. यावेळी 21 सुहासिनी यांनी सद्गुरु नराशाम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सद्गुरु सेवा वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु नराशाम यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी एकच गर्दी केली आहे. यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार डॉ. तुषारजी राठोड, माजी जी.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, बाबाराव एंबडवार, मोहनराव पाटील टाकळीकर, सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रकाश पाटील, श्रावण भिलवंडे, बाळू खोमणे, सुधीर पाटील टाकळीकर, संतोष राठोड, व हेमंत भेंडे,
भार्गव राजे, विशाल चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळू महाराज जोशी येवतीकर, दत्तात्रय पाटील टाकळीकर, राजू पाटील मोकासदरा, व्यंकट पदमवार, पांडुरंग पा टाकळीकर, संतोष महिंद्रकर मुखेड संतोष मोडेवार, चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर, आदी सह अनेकांनी पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here