Home परभणी सेवा पंधरवाडयात नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत – जिल्हाधिकारी आंचल गोयल

सेवा पंधरवाडयात नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत – जिल्हाधिकारी आंचल गोयल

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0036.jpg

सेवा पंधरवाडयात नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत
– जिल्हाधिकारी आंचल गोयल

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी, दि.16 : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची कामे कालमर्यादेत व्हावी याकरीता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे, त्यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्याकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांविषयी प्रलंबित कामांचा कालमर्यादेत निपटारा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.
सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणा-या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करणे व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देणे, सर्व संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा पंधरवड्याचे यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करणे व या संबंधातील प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेणे आणि क्षेत्रीय भेटी देणेबाबत देखील निर्देश दिले आहेत. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये माहिती होण्याकरीता सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसार माध्यमांमधून प्रसिध्दी देणेबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत.

Previous articleअखेर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवीले पाटाचे पाणी…..!.. !शेतक-यांनी मानले खासदार अशोक भाऊ नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांचे आभार….!.
Next articleवडगावच्या एकाला पाच लाखांना गंडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here