आशाताई बच्छाव
!अखेर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवीले पाटाचे पाणी…..!.. !शेतक-यांनी मानले खासदार अशोक भाऊ नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांचे आभार….!.
गडचिरोली,( सुरज गुंडमवार)
चामोर्शी तालुक्यात नॅशनल हायवेचे काम सुरू असल्यामुळे बुजून रोडला शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या आजु बाजुला असलेले पाण्याचे कालवे पुर्णता बंद झाले पावसाने दळी मारल्यामुळे पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पिक पुर्णतः करपले त्यामुळे शेतकऱ्यांना दिना धरणाचे पाणी शेतात न्यायचे कसे? असा प्रश्न शेकडो शेतकऱ्यांना पडला होता
त्यामुळे शेतकऱ्यांनी दिना पाटबंधारे सिंचाई विभागाकडे अनेकदा जाऊन आम्हाला शेतात पाणी नेण्यासाठी पाट काढून द्या किंवा पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी विनंती केली परंतु या वर्षी पाट काढून देणे शक्य नाही व आम्ही पर्यायी व्यवस्था करून देऊ शकत नाही तुम्हीं आधी सांगीतले असते तर काही पर्याय करता आला असता असे उत्तर मिळाले यावेळी शेतकरी निराश झाले तेव्हा कुणीतरी खासदार अशोक भाऊ नेते यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नगरसेवक आशिष पिपरे यांच्याशी संपर्क करा असा सल्ला दिला तेव्हा शेतकऱ्यांनी नगरसेवक आशिष पिपरे यांना आपली व्यथा सांगीतली त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी आशीष भाऊ पिपरे यांनी केली व या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांच्या धानाचे पिक नष्ट होईल ही बाब लक्षात घेऊन तातडीने खासदार अशोक भाऊ नेते व दिनाचे इंजिनिअर बोदलकर यांच्याशी तत्काळ संपर्क साधला व त्यांची अडचण जाणुन घेतली व तात्काळ हायवेचे काम करणाऱ्या ए ,जी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या प्रोजेक्ट मॅनेजरशी खासदार अशोक भाऊ नेते यांनी संपर्क साधला व तंबी देऊन तात्काळ पोकलंड द्या तुमच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, नाहीतर तुमच्या कंपनीसमोर शेतकऱ्यांचा विराट आंदोलन करण्यात येईल व जशास तसे उत्तर देण्यात येईल असे आशीष पिपरे यांनी सांगितले व शेतकरी व सिंचाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवून स्वतः शेतात उभे राहून पोकलंडच्या मदतीने पाट काढत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दिना कालव्याचे पाणी एका दिवसात पोहचविले याला म्हणतात कार्यतत्परता व काम पुर्णत्वास नेण्याची जिद्द व सिंचाई विभागाला अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली हे बघुन कर्मचारी व शेतकरी यांनी खासदार अशोक भाऊ नेते व आशीष पिपरे कौतुक केले व शेतकऱ्यांचे पिक वाचले ? यामुळे उमाजी वासेकर, सुधाकर वासेकर, संजय धोडरे, नैताम, राऊत, शिंदे या सर्व शेतकऱ्यांनी खासदार अशोक भाऊ नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांचे आभार मानले..






