Home Breaking News यावर्षी संपूर्ण देशात पावसाचा हाहाकार!

यावर्षी संपूर्ण देशात पावसाचा हाहाकार!

136

आशाताई बच्छाव

IMG-20220916-WA0020.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: यावर्षी संपूर्ण देशात पावसाचा हाहाकार! यावर्षी संपूर्ण देशात पावसाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण देशात काही ठिकाणी दहा वर्षे काही ठिकाणी पंधरा वर्षे काही ठिकाणी 25 वर्ष अशाप्रमाणे विक्रमी पाऊस यावर्षी पडला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व चारही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे त्यामध्ये खडकवासला, पानशेत ,मुळशी, वीर धरण अशा प्रकारे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे .नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. अमरावती, बुलढाणा, नांदेड त्याचबरोबर मुंबईतील सर्व धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याची चिंता मिटलेली आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी या पावसाचा पिकांना फायदा होतोय, तर काही ठिकाणी याच पावसाचा पिकांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहेत, काही ठिकाणी घर, गाड्या, झाडे यांचे नुकसान पाहायला मिळते. यावर्षी पावसाने संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजवला आहे हे नक्की.

Previous articleयोग,आयुर्वेद, स्वदेशी प्रोडक्ट वर बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद!
Next articleअखेर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवीले पाटाचे पाणी…..!.. !शेतक-यांनी मानले खासदार अशोक भाऊ नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांचे आभार….!.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.