Home Breaking News योग,आयुर्वेद, स्वदेशी प्रोडक्ट वर बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद!

योग,आयुर्वेद, स्वदेशी प्रोडक्ट वर बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद!

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220916-WA0022.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: योग,आयुर्वेद, स्वदेशी प्रोडक्ट वर बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद! पतंजली स्वदेशी कंपनी ही आता भारतात नसून पूर्ण देशांमध्ये पसरलेली आहे. या पतंजलीचा विकास व यांचा टर्नर पाहता मोठ्या कंपनीने या पतंजलीचा धसका घेतलेला आहे. त्यामुळे पतंजली आयुर्वेद, योग, स्वदेशी प्रॉडक्ट या विरोधात षड्यंत्र केले जात आहे. या कंपनीचे प्रोडक्ट खोटं सांगून बदनाम केल्याचा प्रयत्न केला जात आहे असे आज रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. रामदेव बाबांनी सांगितले की पतंजलीने आतापर्यंत पाच लाख लोकांना रोजगार दिले आहेत .इथून पुढेही ते लाखो लोकांना रोजगार देण्याच्या मार्गावरती आहेत. पतंजली योगपीठ, पतंजली कंपनी ही लवकरच आयपीओ बाजारात आणणार आहे. तसेच पतंजली हे आयुर्वेद दीड लाख एकर क्षेत्रामध्ये शेती करत आहे. आताच रुची सोयाबीन या संदर्भात पतंजली वरती अतिग्रहण प्रश्न उठवले जात आहेत. रामदेव बाबांनी सांगितले की देशाला खाद्य तेलात आत्मनिर्भर करणार त्याशिवाय स्वस्त बसणार नाही. पतंजलीकडे सर्वात जास्त शास्त्रज्ञ आहेत हे ते सांगण्यास विसरले नाहीत. आतापर्यंत पतंजलीने दावे करून सर्व उपचारानुसार त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यामुळे या विरोधात नक्कीच बदनामी करण्यासाठी काही कंपन्या सर सावल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये योग, आयुर्वेद त्याचबरोबर स्वदेशी कंपन्या वाचल्या पाहिजेत त्याशिवाय भारत आत्मनिर्भर होणार नाही यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी हे नक्की.

Previous articleआज ७५ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
Next articleयावर्षी संपूर्ण देशात पावसाचा हाहाकार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here