Home रत्नागिरी 5 तासाच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर कासे पुर्ये येथील दरड बाजूला करण्यात ग्रामस्थांना यश

5 तासाच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर कासे पुर्ये येथील दरड बाजूला करण्यात ग्रामस्थांना यश

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0010.jpg

5 तासाच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर कासे पुर्ये येथील दरड बाजूला करण्यात ग्रामस्थांना यश                       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण, संगमेश्वर, खेड, राजापूर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याच पावसात काल रात्री संगमेश्वर तालुक्यातील कासे पुर्ये मार्गावरून दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामुळे नारडुवे, सडयेवाडी, चव्हाण वाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.

दरडी सोबतच मार्गावर मोठं मोठया दगडीही खाली आल्या होत्या. ग्रामस्थांना या मार्गावरून जाणे येणे कठीण झाले होते. पुर्ये ग्रामस्थांनी पोलीस पाटील जगदीश जड्यार यांच्या पुढाकाराने व किशोर घाग यांच्या जेसीबीच्या सहायाने सलग पाच तास श्रमदानातून दरड हटवण्याचे काम सुरू केले. 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मार्गावर दरड बाजूला करण्यात आली व रस्ता मोकळा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here