Home रत्नागिरी शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्ट्या जाहीर गोपाळकाला, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीला सुट्टी

शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्ट्या जाहीर गोपाळकाला, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीला सुट्टी

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0009.jpg

शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्ट्या जाहीर गोपाळकाला, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीला सुट्टी                                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी शासकीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी 30 अतिरिक्त सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्यांव्यतिरिक्त जादा तीन सार्वजनिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आहेत . त्यानुसार जिल्ह्यात २०२२ मध्ये आणखी तीन सुट्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या आहेत.

शासन ठराव राजनैतिक व सेवा विभागाकडील प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या सुट्या जाहीर केल्या आहेत. त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी २०२२ या वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीसाठी शुक्रवारी १९ ऑगस्टला गोपाळकाला, सोमवारी ५ सप्टेंबरला गौरी विसर्जन आणि शुक्रवारी ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी हे दिवस स्थानिक सुट्याचे दिवस म्हणून जाहीर केले आहेत.

Previous article5 तासाच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर कासे पुर्ये येथील दरड बाजूला करण्यात ग्रामस्थांना यश
Next articleआडिवरे येथील श्री दत्तप्रसाद पेट्रोल पंपाचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here