Home पुणे महापालिकेतील TDR घोटाळ्याची चौकशी होणार ? थेट ED कडे तक्रार केल्याने एकच...

महापालिकेतील TDR घोटाळ्याची चौकशी होणार ? थेट ED कडे तक्रार केल्याने एकच चर्चा

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20231222_051723.jpg

महापालिकेतील TDR घोटाळ्याची चौकशी होणार ? थेट ED कडे तक्रार केल्याने एकच चर्चा
पुणे ब्युरो चिप उमेश पाटील
पिंपरी-चिंचवड महापालिकेत शेकडो कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच (ता.१२) केला. त्यात उद्योगनगरीतील महायुतीच्या तिन्ही आमदारांसह महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे ही त्यात सामील असल्याचा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकापरिषद घेऊन नंतर (ता.१५) पिंपरीत केला. तर, आज (ता.१८) संभाजी ब्रिगेडने त्याची थेट ईडीकडे तक्रार करीत चौकशीची मागणी केली.
वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या घोटाळ्यात पिंपरी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची मुख्य भूमिका असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ईडीकडे केलेल्या तक्रारीत ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे.

Previous articleयुवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड!
Next articleST बस आणि दुचाकीचा #भीषण अपघात, 3 ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here