Home कोल्हापूर से.निवृत्त कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी , कामगार आसोसिएशन

से.निवृत्त कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी , कामगार आसोसिएशन

155
0

राजेंद्र पाटील राऊत

से.निवृत्त कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी ,
कामगार आसोसिएशन

“राज्य गुणवंत कामगार असोसिएशन”च्यावतीने, देशातील सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ करावी यासाठी, यापूर्वी मा. पंतप्रधानसो व मा. केंद्रीय कामगार मंत्री व जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर यांना निवेदन देणेत आली होती. तसेच कोल्हापूरचे लोकप्रिय व अभ्यासू खासदार मा. धैर्यशील माने साहेब यांना, प्रत्यक्ष भेटून “EPS-95” या योजनेत बदल करून, पेन्शनमध्ये वाढ करावी या संदर्भात निवेदन देणेत आले.यावेळी मा. खासदार महोदयांनी, याआधी सुध्दा लोकसभेमध्ये या संदर्भात विषय उपस्थित केला असलेचे समजले. लोकसभेचे अधिवेशन दि. १९ पासून सुरू होणार असून, सदर अधिवेशनामध्ये हा प्रश्न स्वतःच्या माध्यमातून अग्रक्रमाने उपस्थित केला जाईल, असे आश्वासीत केले.
त्याचबरोबर देशातील इतर सन्मा. सहकारी खासदार महोदयांना बरोबर घेऊन, संघटितपणे सेवानिवृत्त कामगार / कर्मचारी यांच्या पेन्शनमध्ये वाढ करणेसाठी, त्यांचे देशाप्रती तारुण्यातील योगदान लक्षात घेऊन, मा. पंतप्रधानसो महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सध्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शननुळे जेष्ठ सेवानिवृत्तांना वार्धक्यामुळे होणारा त्रास, मा. पंतप्रधानसो यांना प्रत्यक्ष भेटीच्यावेळी अवगत केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले.
मा. खासदार महोदयांनी EPS-95 या विषयाच्या अनुसंगाने, स्वतः खूपच माहिती आत्मसात केल्याचे त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतील, कामगार वर्गा संबंधित प्रगल्भ विचारसरणी व अभ्यासपूर्ण चर्चेद्वारे समजले.
सदर निवेदन देताना झालेली चर्चा, खूपच चांगल्या पध्दतीने व सकारात्मक दृष्टीकोनातून केल्याबद्दल, मा. खासदार धैर्यशील माने साहेबांचे, असोसिएशनच्यावतीने आभार व्यक्त करणेत आले.
यावेळी “राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे” अध्यक्ष मा. सुरेश केसरकर, कार्यकारी सदस्य मा. महादेव चक्के, विभागीय सदस्य मा. शिवाजी चौगुले, मा. संभाजी थोरात, मा. भगवान माने, मा. यशवंत पाटील, मा. बाळासाहेब कांबळे, मा. प्रविण भिके, मा. शिवाजी लोहार, मा. नंदकुमार ढेरे, मा. विजय जाधव, मा. गणेश पोटफोडे, मा. बबन देवर्डेकर, मा. सर्जेराव पाटील, मा. प्रदीप पाटील, मा. राजेंद्र पवार, मा. दिपक सुतार, मा. गजानन हिरवे, मा. शरद देसाई, मा. दिनकर आडसुळ, मा.सुभाष टाकळकर, मा. मुनीर मुल्ला, मा. लक्ष्मण गळवे, मा. बाळासाहेब चौगले, मा. रमेश तळसकर, मा. प्रशांत उपाध्ये, मा. भास्कर शिंदे, मा. सर्जेराव पाटील, मा. नामदेव चव्हाण इत्यादी सहकारी उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleउमराणे, खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द
Next articleजिजाऊ जन्मोत्सव सोहळा संभाजी ब्रिगेड तलवाड एम तालुका भालकी कर्नाटक राज्य येथे संपन्न…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here