Home सोलापूर ST बस आणि दुचाकीचा #भीषण अपघात, 3 ठार

ST बस आणि दुचाकीचा #भीषण अपघात, 3 ठार

135

आशाताई बच्छाव

IMG_20231222_052141.jpg

ST बस आणि दुचाकीचा #भीषण अपघात, 3 ठार
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

बार्शी – तालुक्यातील तांदुळवाडीनजीक ST महामंडळाची बस आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये 3 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

महामंडळाची पुणे-धाराशिव बस बार्शीमार्गे धाराशिवकडे जात होती. तर, धाराशिव येथून दुचाकीवरून तिघे बार्शीच्या दिशेने येत असताना तांदुळवाडी नजीक हा भीषण अपघात झाला. अपघातातील तिघे मृत धाराशिवचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून स्थानिकही मदतीसाठी धावले.