Home नाशिक पिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने

पिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0057.jpg

पिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अवचित्याने संपूर्ण भारत भर हा उत्सव साजरा होत आहे . याच अनुषंगाने पिंगळवाडे गावात सुद्धा हर घर तिरंगा दिसत आहेत. साधारण हजाराच्या पुढे लोक वस्ती असलेल्या पिंगळवाडे गावात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकत आहे. तसेच नागरिक सुद्धा या तिरंगा ध्वजाचे सन्मान पूर्वक जतन करत आहेत. विशेष बाब म्हणजे पिंगळवाडे गावातील बहुतांशी नागरिक मळ्यात किंवा वाडी वस्त्यांवर वास्तव्यास आहेत तरी सुद्धा राष्ट्रप्रेमाचे प्रतीक राष्ट्रध्वज आप आपल्या राहत्या घरी मोठ्या डौलाने नागरिकांनी लावले आहेत. ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना सुद्धा ग्रामपंचायत यांच्यामार्फत आव्हान केले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा प्रांगणात सुद्धा ठीक ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हर घर तिरंगा दिसत आहेत. त्यात ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, तलाठी कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी, आणि या सर्व कार्यालयांच्या ध्वजांचे काळजी व सांभाळ संबंधित कर्मचारी करत आहेत तसेच गावातील नागरिक या अमृत महोत्सवाचे जल्लोष साजरा करत आहेत

Previous articleहर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा ह्या उद्देशाने शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने झोपडपट्टीमधील नागरिकांना तिरंगा भेट.
Next articleइजिप्तच्या गिजा शहरात चर्चला भीषण आग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here