आशाताई बच्छाव
१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त महावितरणचे गजानन जाधव यांना गुणवंत कामगार पुरस्कार
माहोरा प्रतिनिधी -मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की, १ मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार व आर्थिक वर्ष २०२३ – २०२४ यामध्ये विक्रमी वीज बिल वसुली,वीज गळती कमी करणे,वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे याकामी महावितरणतर्फे कामगार दिनानिमित्त सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता व मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या माहोरा येथील श्री गजानन जाधव यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. काल दिनांक ०३ मे रोजी शुक्रवारी माहोरा येथे सरपंच गजानन पाटील लहाने व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी सरपंच गजानन लहाने यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या वेळी ग्रा.सदस्य प्रभाकर नाना शहागडकार, ज्येष्ठ नागरीक वामनराव लहाने, बजरंग दादा बोरसे,ग्रा. सदस्य बाबसाहेब बोरसे, सांडू अण्णा शिंदे, ग्रा .सदस्य सुभाषराव देशमुख , पत्रकार मुरलीधर डहाके, योगेश औटी,ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण वाघ साहेब,गणेशराव कासोद,संतोष गौरकर, कैलासराव लहाने, बाळू लहाने पत्रकार गणेश पगारे व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.






