• Home
  • 🛑 मी खा.विनायक राऊत यांचा मुलगा आहे…! तुला मी सोडणार नाही…! मुलाने पोलिसांना दिली धमकी 🛑

🛑 मी खा.विनायक राऊत यांचा मुलगा आहे…! तुला मी सोडणार नाही…! मुलाने पोलिसांना दिली धमकी 🛑

🛑 मी खा.विनायक राऊत यांचा मुलगा आहे…! तुला मी सोडणार नाही…! मुलाने पोलिसांना दिली धमकी 🛑
✍️सिंधुदुर्ग 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सिंधुदुर्ग :⭕ शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने कणकवलीच्या मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. त्यासाठी राणे यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे त्यात राऊत यांचा मुलगा शिवीगाळ करताना दिसत आहे. भरपावसात पोलीस ड्यूटी करत आहेत आणि खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धी नसल्यासारखा त्याला शिव्या देतोय असं राणेंनी म्हटलं आहे. दारु पिऊन गाडी चालवली तर पोलीस पकडणारच, असेही निलेश राणे म्हणाले.

या व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्याशी भर रस्त्यात हुज्जत घालत असल्याचे दिसत आहे.

भरपावसात पोलीस ड्यूटी करत आहेत आणि खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धी नसल्यासारखा त्याला शिव्या देतोय असं राणेंनी म्हटलं आहे. दारु पिऊन गाडी चालवली तर पोलीस पकडणारच, असेही निलेश राणे म्हणाले.

या व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्याशी भर रस्त्यात हुज्जत घालत असल्याचे दिसत आहे.

मी विनायक राऊत यांचा मुलगा आहे. तुला सोडणार नाही, असेही गीतेश राऊत बोलत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना निलेश राणे यांनी, ‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहे.

खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतो. दारु पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारच. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात कलम 353 आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा.’ असे म्हटले आहे. तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी आपला मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि जर तो दोषी नसेल तर संबंधित पोलिसांवर कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment